मुसळधार पावसाने नागरिकांच्या घरात पाणीच पाणी...

Foto
औरंगाबाद शहरात रात्री मुसळधार पाऊस झाल्याने सिडको एन-६ आविष्कार कॉलनी येथील नागरिकांच्या घरात पाणीच पाणी झाले. नागरिकांनी रात्र जागून काढून घरातील पाणी काढण्यासाठी कसरत केली. 

काल रात्री शहरात मुसळधार पाऊस पडला. यावेळी शहरातील आविष्कार काॕलनी सिडको एन-६ येथे राहणाऱ्या नागरिकांच्या घरात प्रचंड प्रमाणात पाणी शिरले. घरोघरी पाणीच पाणी झाले. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. नागरिकांनी रात्र जागून काढण्याची वेळ आली. रात्रभर जागरण करून घरातील पाणी सकाळ पर्यत काढण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागली. नागरिकांचे यात घरातील वस्तू देखील पाण्याने भिजल्या. यामध्ये लहानपणापासून ते जेष्ठ नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे अशा परिस्थितीला पुन्हा नागरिकांना सामोरे जावे लागू नये यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात. अशी मागणी नागरिक आणि आरपीआय विद्यार्थी आघाडी(खरात) चे अध्यक्ष मनिष नरवडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.